नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्मकुमारी संस्थेचा प्रेरणादायी कार्यक्रम – आजचा महाराष्ट्र

पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्मकुमारी संस्थेचा प्रेरणादायी कार्यक्रम

प्रतिनिधी

ठाणे :- ५ जून पर्यावरण दिवसानिमित्त किशोर येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रकाशमणी पार्क मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रेरणादायी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुरबाड पंचायत समितीच्या बी डी ओ डॉक्टर लता मॅडम, राजयोगिनी आदरणीय बीके कुसुम दीदीजी, किशोरचे माजी सरपंच संजय गायकर, बिर्ला कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर कांतीलाल नागरे, प्रोफेसर विश्वनाथ नागरे, फार्मा कंपनी चे मॅनेजर अविनाश पाटील, लता गायकर, बीके कल्पना दीदीजी, पत्रकार श्याम राऊत, जगन्नाथ गायकर, चेतन

पोतदार उपस्थित होते.बी डी ओ डॉक्टर लता मॅडम यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांंनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची प्रेरणा दिली. आदरणीय राजयोगिनी बीके कुसुमा दीदीजी यांनी पर्यावरणासाठी आपली कृतज्ञता व्यक्त केली व ईश्वरीय शक्तीसोबत आशीर्वचन दिले. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोभाव व्यक्त करत पर्यावरण दिवसानिमित्त शुभकामना दिल्या. ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये नियमित ईश्वरीय ज्ञान व राजयोगाचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी पर्यावरण सुरक्षा जनजागृती करताना आपल्या विचारांचा प्रभाव प्रकृतिच्या तत्वांवर पडतो आणि तोच प्रभाव प्रकृतिच्या पंच तत्वांनी बनलेल्या शरीरावर पण कसा पडतो हे सांगून मेडिटेशन व सकारात्मक विचारांचे महत्व सर्वांं समोर ठेवले. कु. रोशनी, कु. कृष्णा व कु. सिद्धी यांनी अतिशय सुंदर भाषण करून मेडिटेशनचे महत्व सांगत पर्यावरणासाठी विशेष मेडिटेशनचा अभ्यासही करवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी वैशाली दीदी यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]