नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी २५ दिव्यांगाना दिला मदतीचा हात. – आजचा महाराष्ट्र

माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी २५ दिव्यांगाना दिला मदतीचा हात.

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

दिव्यांग बांधवांना आपला संपूर्ण पगार व पेन्शन देणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून मनोहरशेठ भोईर सुपरिचित.

सध्या मनोहरशेठ भोईर हे माजी आमदार म्हणून कार्यरत.

रायगड (उरण) :- दि २. रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील दिव्यांग मित्र म्हणून सुप्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी १ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील २५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे . प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहावा असे त्यांचे मत आहे. या करिता त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून दरवर्षी दिव्यांग बांधवांना ते मदत देत आहेत. प्रत्येक दिव्यांग स्वबळावर उभा राहावा, स्वतःचा व्यवसाय करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. माजी आमदार जेव्हा प्रत्यक्ष आमदार होते त्यावेळेस त्यांच्या आमदार निधीतून सदर निधी वाटप करत होते. आत्ता त्यांना मिळणाऱ्या पेन्शन मधूनही हे निरंतर चालू ठेवले आहे. दिव्यांग बांधवांप्रती असणारी आपुलकी आणि प्रेम यामुळे त्यांना दिव्यांग स्वर्गीय महादेव रामदास पाटील (मामा) यांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना ‘दिव्यांग मित्र’ ही उपाधी दिली.त्याचबरोबर सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उरण तालुक्यातील प्रत्येकाला मनोहर शेठ भोईर यांनी आवाहन केले होते की एकमेकांना मदत करा. गोर गरिबांची सेवा करा. एकमेकांच्या अडचणी सोडवा. एकजूट हाऊन समस्या सोडवा असे आवाहन केले.याचाच आदर्श घेत ‘आई फाउंडेशनचे’ दिव्यांग संदेश राजगुरू आणि महेश पाटील यांनी १०० पेन शैक्षणिक साहित्य म्हणून वाटप केले.या कार्यक्रमा मुळे प्रत्येकाला प्रेरणा मिळाली की आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना मदतीचा हात द्यायला पाहिजे जेणेकरून तळागाळातील गरीब गरजू कुटुंबांपर्यंत आणि दिव्यांगांनाही मदतीचा हात मिळेल.माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या सभासदांनीही मोलाचे सहकार्य दिले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उरण तालुक्यातील दिव्यांग मानसी विजय गावडे हिने बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून प्राविण्य मिळवले त्याबद्दल तिला ‘दिव्यांग सामाजिक संस्था उरण’ कडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण दिव्यांग मित्र माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केलेल्या दिव्यांगांसाठी मदतीचा हात या कार्यक्रमाचे नक्कीच प्रत्येक दिव्यांगाला सक्षम करण्यासाठी उपयोगी ठरेल.संपूर्ण महाराष्ट्रात असा एकमेव आमदार आहेत जे अगोदर आपला संपूर्ण पगार व आता निवृत्ती झाल्यानंतर म्हणजेच माजी आमदार झाल्या नंतर सर्व पेन्शन दिव्यांग बांधवाना देतात. म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]