नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भरणे मंडळातील आपत्तीपूर्व उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली – आजचा महाराष्ट्र

भरणे मंडळातील आपत्तीपूर्व उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली

प्रतिनिधी राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड-भरणे) :- दि. ३० मे २०२५ भरणे मंडळातील पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता काळकाई सभागृह, भरणे नाका, खेड येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक मा. उपविभागीय अधिकारी सो. खेड आणि मा. तहसीलदार सो. खेड यांच्या सुचनेनुसार भरणे मंडळ अधिकारी श्री. उमाकांत देशमुख भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस भरणे मंडळातील सात सजे अंतर्गत एकूण १९ महसुली गावांचे सरपंच, तंटामुक्ती

अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महामार्ग प्राधिकरण प्रतिनिधी, ग्राम महसुल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, प्राचार्य, मुख्याध्यापक, पोलिस पाटील, रेशन दुकानदार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.बैठकीची सुरुवात महसूल विभागाच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या आपत्ती व त्यांच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त सूचना मंडळ अधिकारी श्री. देशमुख यांनी वाचून दाखवल्या व त्यांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.बैठकीनंतर चहा-नाश्ता व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी व मंडळ अधिकारी श्री. देशमुख यांनी संयुक्तपणे भरणे उड्डाण पूल, शिवाजी पुतळा, नवभारत कॉलेज परिसर, जगबुडी नदी या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पावसापूर्वी आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]