नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तंबाखूविरोधी दिनानिमित्त ‘जीवन धारा’ संस्थेच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद – आजचा महाराष्ट्र

तंबाखूविरोधी दिनानिमित्त ‘जीवन धारा’ संस्थेच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी

मुंबई :- २९ मे जीवन धारा’ संस्थेच्या वतीने जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना  खेळवण्यात आला. या उपक्रमाला युवक युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून तंबाखूविरोधी संदेश दिला. या फूटबॉल स्पर्धेत युवक युवती अशा एकूण १७ संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार ठरला. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट तरुणांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती निर्माण करणे हे होते. खेळाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणं, हे ‘जीवन धारा’चे

ध्येय या उपक्रमातून अधोरेखित झाले.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शोभा बाजपई डिसल्वा यांनी सांगितले, “तरुणांमध्ये तंबाखूच्या व्यसनांविषयी जागरूकता निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. खेळ हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आरोग्य, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना प्रोत्साहन देत आहोत.स्पर्धेनंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देण्यात आली. यावेळी स्थानिक माजी नगरसेवक मोहम्मद शिराज, समाजसेवक विशाखा, मिसेस डे व पालकांचीही उपस्थिती लक्षणीय होती.’जीवन धारा’चा हा उपक्रम युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]