बडनेरा वर्कशॉपसाठी सिलेक्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच रिलीव; मनसेच्या मोर्चानंतर प्रशासनाचे पाऊल
प्रतिनिधी
मुंबई – बडनेरा रेल्वे वर्कशॉपसाठी इंजिनिअरिंग विभागातून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल सात महिने उलटूनही रिलीव्ह करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
(CSMT), मुंबई येथील महाव्यवस्थापक (GM), मध्य रेल्वे कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाची तात्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने त्वरित कृती करत आजच एक अधिकृत पत्रक जारी केले असून, त्यामध्ये विलिंग्नेस प्रोसेस सुरू करण्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बडनेरा
वर्कशॉपसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना आता लवकरच रिलीव्ह करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.या आंदोलनाच्या माध्यमातून मनसे रेल्वे सेनेने कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील आणि सचिव श्री.स्वप्नील पंडीत, तसेच इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













