तिसे रोहा येथे धर्म रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास व गुढीपाडवा भक्तिमय वातावरणात संपन्न
प्रतिनिधी
रायगड (कोलाड-तिसे) : दिनांक २९ ते ३० /०३/ २०२५ रोजी वीर हनुमान युवक मंडळ ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांच्या वतीने श्री छत्रपती संभाजी राजे बलिदान मास का पाळायचे यासाठी समाज प्रबोधन करून बलिदान मासांचे कार्यक्रम पार पाडण्यात आले नूतन 
वर्ष स्वागत हिंदूधर्म संस्कृतीचे जतन कशाप्रकारे करायचे याचे जलंत उदाहरण ग्रामस्थ व तरुणाने दाखवून दिले ही आजकालाची गरज आहे सकाळी पहाटे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही धर्म संस्कार विधी विधान करून श्री श्री श्री छत्रपती शिवाजी राजे धर्मवीर संभाजी राजे व ज्या राजमातेने स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी राजांच्या मनामध्ये रुजवली अशा राजमाता जिजाऊ मासाहेब यांची 
विधिवत पूजा आरती त्याचप्रमाणे ग्रामदेवता आई सोमजाई माता जयघोषाने गुढी उभारण्यात आली शिवभक्ती हीच माझी शक्ती या घोषवाक्याने प्रेरित असलेले शिवभक्त यांनी श्री क्षेत्र तुळजापूर येथून आईच्या चरण चरण स्पर्श करून आणलेली कवड्यांची माळ व आनंद कानन म्हणजे काशी वाराणसी येथून आणलेली रुद्राक्ष माळ छत्रपतींच्या चरणाजवळ अर्पण केली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













