धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास व हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा उत्साहात साजरी
प्रतिनिधी
रायगड (कोलाड) :- कोलाड पंचक्रोशी, २९ मार्च २०२५ – सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने फाल्गुन अमावस्येच्या दिवशी धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसाचे स्मरण करत ‘धर्मवीर बलिदान मास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री 
क्षेत्र तुलापूर येथून आणलेल्या धर्मवीर ज्वालेच्या प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.धर्मवीर संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने श्री हनुमंत रायाचे पूजन तसेच सनातन संस्था व सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने 
हनुमान चालीसीचे सामुदायिक पठण करण्यात आले.हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचा भव्य सोहळा रविवार, ३० मार्च २०२५ रोजी सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ‘हिंदूंनो धर्म जाणा, धर्म जगा, धर्म रक्षणासाठी संघटित व्हा’ या उद्घोषणांनी वातावरण भारावून गेले. श्री अंबर सावंत महाराज मंदिरात पूजा व आरतीनंतर 
शोभायात्रेला प्रारंभ झाला.या शोभायात्रेत लहान मुलांनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले. जय भवानी मित्र मंडळ चिंचवली यांच्या वतीने विशेष लाठी-काठी सादर करण्यात आली. या शोभायात्रेचे यजमानपद श्री राम नवतरुण मित्र मंडळ, महादेववाडी यांनी भूषवले.सायंकाळी ७ वाजता सामूहिक आरती व महाप्रसादाने या भव्य सोहळ्याची सांगता झाली.जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













