कुंभोजच्या सरपंच स्मिता चौगुले यांचा राजीनामा
प्रतिनिधी किशोर जासूद
सरपंच पदासाठी जयश्री महापुरे यांच्या नावाची चर्चा
कोल्हापूर (हातकणंगले ) :- कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी हालचालींना वेग आला असून, विद्यमान सरपंच स्मिता चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण आणि हातकणंगले तालुका गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.महाविकास आघाडीत पूर्वीच ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा ठेवण्यात आला होता. त्यानुसार, स्मिता चौगुले यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. 
त्यानंतर सरपंच पदासाठी जयश्री महापुरे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.गावात यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले असून, नव्या सरपंच पदाच्या निवडीसाठी लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयानुसार जयश्री महापुरे या नव्या सरपंच म्हणून निवडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभोज ग्रामपंचायतीच्या नव्या नेतृत्वाची घोषणा लवकरच होईल.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













