कोलाड ग्रामपंचायतीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी
रायगड – रोहा (कोलाड) : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त “सुरक्षित तट – समृद्ध भारत” या संकल्पनेवर आधारित सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सायकलपटूंना देशाच्या ६,५५३ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीलगत प्रवास करायचा आहे. या
उपक्रमाचा उद्देश शारीरिक क्षमता, धैर्य आणि देशाच्या सागरी सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच स्थानिक सुरक्षा यंत्रणा व नागरिकांशी संवाद साधून देशभक्तीची भावना जागृत करणे हा 
आहे.या मोहिमेची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ७ मार्च रोजी आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून झाली. मोहिमेच्या दरम्यान, सायकल पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करत कोलाडमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त कोलाड ग्रामपंचायत व कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य स्वागत 
करण्यात आले.कोलाड पोलीस स्टेशनचे API नितीन मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांसह CISF कमांडर रायमोहन (JNPT सेवा), असिस्टंट कमांडर राममूर्ती, CISF PI सतीश कदम (RCF) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच ग्रामपंचायत सरपंच शर्मिला सागवेकर, उपसरपंच उत्तम बाईत, सदस्य श्रीकांत चव्हाण, श्री.संजय लोटणकर, पुई सरपंच संजय मांडूस्कर ,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष प्रीतम पाटील ,कोलाड माजी उपसरपंच रवी सागवेकर, पुरोहित महेश स्वामी जंगम,पुरोहित आनंता जोशी, राजेश कदम ,अजय लोटणकर ,संजीव कुर्ले , भरत सातांबेकर,श्री. वाचकवडे 
रवींद्र सागवेकर अशी अनेक प्रतिष्ठित महिला व पुरुष वर्ग तसेचअनेक ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजनकोलाड पोलिस स्टेशन तसेच श्री. संतोष बाईत व रवींद्र सांगवीकर यांनी केले. कोलाड ग्रामस्थांनी आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सायकल रॅलीला भरभरून प्रतिसाद दिला. “सुरक्षित तट – समृद्ध भारत” या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













