नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवक्षेत्र मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाचे भव्य लोकार्पण – आजचा महाराष्ट्र

शिवक्षेत्र मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाचे भव्य लोकार्पण

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम

ठाणे (भिवंडी) :– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या शक्तिपीठ मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवजन्मोत्सवाच्या तिथीप्रमाणे शुभेच्छा देत शिवप्रेमींना संबोधित केले.मुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपल्याला आपल्या इष्ट देवतांचे दर्शनही घेता आले नसते. जसे बजरंगबलीच्या दर्शनाशिवाय प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन अपूर्ण आहे, तसेच शिवरायांशिवाय इतर देवतांचे दर्शन अपूर्ण आहे.”शक्तिपीठाला तीर्थक्षेत्राचा दर्जा या मंदिराला तत्काळ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. शिवरायांचे जीवन हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. या मंदिरात छत्रपती शिवरायांसोबत तुळजाभवानी माता आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांचेही स्थान आहे, त्यामुळे हे केवळ मंदिर नसून राष्ट्रमंदिर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि अन्याय्य विचारांचे उच्चाटन”छत्रपती शिवरायांचे विचार हेच महाराष्ट्राची ओळख आहेत. राज्यात औरंगजेबाच्या क्रूर विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यात महिमामंडन होईल, ते केवळ

छत्रपती शिवरायांचेच!इतिहासाचे जिवंत दर्शन देणारे प्रेरणास्थळ या मंदिरात छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचा सुंदर कलात्मक आविष्कार साकारण्यात आला आहे. यातून भविष्यातील पिढ्यांना शिवचरित्राची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, तुंगारेश्वर देवस्थानचे परम पूज्य बालयोगी सदानंद महाराज, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे,

महेश चौघुले, दौलत दरोडा तसेच शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.शिवक्रांती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, या मंदिरामुळे शिवचरित्राचा जागर अधिक व्यापक पातळीवर होईल, असा विश्वास व्यक्त केला. हे शक्तिपीठ भाविकांना केवळ धार्मिक अनुभवच नव्हे, तर इतिहासाच्या गौरवशाली आठवणींची अनुभूतीही देईल, असे ते म्हणाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]