नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल खवटी – १९९८ दहावी बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल खवटी – १९९८ दहावी बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- कर्जत (लेक व्हू फार्म) – न्यू इंग्लिश स्कूल, खवटीच्या सन १९९८ च्या दहावी बॅचने तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत गेट-टुगेदर आयोजित केला. हा भावनिक आणि उत्साहपूर्ण सोहळा कर्जत येथील “लेक व्हू फार्म” या ठिकाणी संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले व्यक्तिगत मनोगत व्यक्त केले. २६ वर्षांनंतर

पुन्हा भेट होत असल्याने सर्वांमध्ये आनंद, nostalgiचा भाव आणि शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला.जुन्या आठवणींना उजाळा गेट-टुगेदरमध्ये प्रत्येकाने आपला परिचय दिला तसेच शालेय जीवनातील गमतीशीर आणि संस्मरणीय क्षण शेअर केले. शाळेबद्दल असलेला स्नेह आणि आपुलकी अखेरपर्यंत टिकेल, अशी ग्वाही सर्वांनी दिली.सन्मान आणि श्रद्धांजली शाळेच्या माजी विद्यार्थ्यांपैकी काहीजण आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या वेळी करण्यात आला. तसेच, आपल्या बॅचमधून ज्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महिलांसाठी हळदीकुंकू आणि पुढील गेट-टुगेदरची घोषणा यावेळी उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर जुन्या आठवणींना उजाळा देत हशा-टवाळ्या, गप्पा, मनोरंजन आणि फोटोसेशनचा कार्यक्रम रंगला.पुढील गेट-टुगेदर ग्रामीण भागात आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी १९९८ दहावी बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]