नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवी दिशा, नवे उपक्रम – राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न – आजचा महाराष्ट्र

नवी दिशा, नवे उपक्रम – राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला वाव देणाऱ्या ‘नवी दिशा, नवे उपक्रम’ या उपक्रमांतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वर्षीचा माननीय पुरस्कार श्री. सुनिल भगवान जाबरे (शाळा – पिंपळी बुद्रुक, ता. चिपळूण) यांना प्रदान करण्यात आला.उपक्रमशीलता हे शिक्षकांच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नवनवीन संकल्पना राबवाव्यात, हा ‘नवी दिशा, नवे उपक्रम’ या समूहाचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव

एकत्र करून त्यांचे संकलन प्रकाशित करण्याचा या उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा यंदा पूर्ण झाला.गौरव सोहळा आणि पुस्तक प्रकाशन:दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी संजोग हॉटेल, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात उपक्रमशील शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला. या वेळी सुप्रसिद्ध रानकवी धांडे सर आणि लेखिका अंजली अत्रे मॅडम यांनी श्री. सुनिल भगवान जाबरे सरांचा सन्मान करत त्यांच्या कार्याची स्तुती केली.यावेळी उपस्थितांनी धांडे सरांच्या कवितांचा आस्वाद घेतला. त्यांच्या काव्यसादरीकरणाने उपस्थितांना बहिणाबाईंच्या कवितांची आठवण करून दिली. निसर्गात वाढलेला, निसर्गाशी एकरूप झालेला हा प्रतिभावान कवी सर्वांच्याच मनावर छाप पाडून गेला.शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला प्रोत्साहन या कार्यक्रमात इतर अनेक उपक्रमशील शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्यावर कौतुकाची शाबासकीची थाप देत त्यांना आणखी चांगले उपक्रम राबवण्यास प्रेरित करण्यात आले. अशा गौरवामुळे नव्या कल्पनांना चालना मिळते आणि शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम होते.‘नवी दिशा, नवे उपक्रम’ या समूहाच्या माध्यमातून यापुढेही असेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आकाराला यावेत, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]