पाटण तालुका पत्रकार संघाचा १५ वा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
प्रतिनिधी शशिकांत माथने
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाटण :- ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित १५ वा सांस्कृतिक महोत्सव हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बाळासाहेब देसाई कॉलेजच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या
देशभक्तीपर गाणी, लावणी, पारंपरिक नृत्य, प्रबोधनपर पथनाट्य, विनोदी नाटिका आणि कोळी नृत्य यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अनंत गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयसिंह 
पाटील, कोयना शिक्षण संस्थेचे संचालक संजीव चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव माने, कार्याध्यक्ष जयभीम कांबळे, उपाध्यक्ष सुरेश संकपाळ व उमेश सुतार, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक शंकरराव मोहिते, राज्य महिला प्रतिनिधी विद्या नारकर, सचिव भगवंत लोहार, जेष्ठ पत्रकार
बाळासाहेब पवार, विक्रांत कांबळे, जालिंदर सत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान सास्कृतिक महोत्सवात पाटण व परिसरातील प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यम शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीते आणि देखावे सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मराठमोळ्या लावणी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.यावेळी सर्व सहभागी शाळा आणि महाविद्यालयांना पाटण तालुका पत्रकार संघातर्फे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सोलर पॉवर व्हिजनचे जयभीम कांबळे यांच्यातर्फे शाळांना विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.सांस्कृतिक ठेवा जोपासण्याचा पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा सांस्कृतिक महोत्सव गेली १५ वर्षे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना 
एक वेगळे व्यासपीठ मिळते आणि पाटण तालुका पत्रकार संघाने सांस्कृतिक ठेवा जोपासला आहे, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघाचे राजेंद्र सावंत, नितीन खैरमोडे, योगेश हिरवे, निलेश साळुंखे, संजय कांबळे, खाशाबा चव्हाण, अरुण गुरव, बाबासो सुतार, सुधीर लोहार, प्रकाश कांबळे, शशिकांत माथने तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













