नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

खवटी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी. के. दरेकर ज्युनिअर कॉलेज, खवटी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मन्सूरभाई जोगिलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयजी

दरेकर, सचिव श्री. धनंजय दरेकर, सहसचिव श्री. अविनाश वाडेकर, खजिनदार श्री. मनोहर दळवी, तसेच अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली.दिनांक २३ ते २६ जानेवारीदरम्यान क्रीडा महोत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात

आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ, महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान, सत्यनारायण महापूजा, फनी गेम्स, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट स्पर्धा, फूड फेस्टिव्हल यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.सायंकाळी “स्नेहगंध” सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचाही यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल व गृहराज्यमंत्री श्री. योगेशदादा कदम यांचे विशेष उपस्थिती लाभली. त्यांचे फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने शाल,

श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मंत्री महोदयांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यात आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटिका व विविध कलाकृतींना उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]