श्री स्वामी समर्थ अखंड नामजप सप्ताह सोहळा संपन्न
प्रतिनिधी
श्री गजानन प्रसन्न।। श्री रातुबाई माता प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न।।
रायगड (माणगांव – रातवड) :- श्री स्वामी जीवन विकास मंदिर, रातवड (रजि. नं. ए-१५५५, रायगड) यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अखंड नामजप सप्ताह सोहळा दिनांक २५ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.सोहळ्याची सुरुवात शनिवार, २५ जानेवारी रोजी सकाळी ८.०० वाजता ह.भ.प. श्री तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते मंच पूजनाने झाली. यानंतर 
विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. गणेशयाग, चंडी याग, कुंकुमार्चन, (सरीताताई लिंगायत वास्तू तदण्य पुणे) रायगड भूषण व विद्या वाचास्पती ह.भ.प.श्री.मारुती महाराज कोल्हाडकर महाआरती आणि कीर्तनाचा कार्यक्रम भक्तगणांनी भक्तिभावाने अनुभवला.दुसऱ्या दिवशी, २६ जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्यात 
सहभाग घेतला. यानंतर महाआरती व कीर्तनाचा कार्यक्रम झाला.सोहळ्याचा सांगता दिवस, २७ जानेवारी रोजी महाआरती, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने संपन्न झाला. या प्रसंगी ह.भ.प. श्री तुकारामबाबा महाराज, तसेच चिखलगीभुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प. श्री तुकारामबाबा महाराज (मंगळवेढा, सोलापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.सोहळ्यादरम्यान 
स्वामी भक्तांचा ओघ वाढत गेला आणि परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील तसेच दूरवरून आलेल्या स्वामी सेवे कऱ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! या वचनांचा प्रत्यय या भक्तिभावपूर्ण सोहळ्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या चरणी भाविकांनी नतमस्तक होत भावपूर्ण वातावरणाचा अनुभव घेतला.
श्री स्वामी समर्थ प्रसन्न! जय स्वामी समर्थ!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













