तिसे गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, गावकऱ्यांचे विशेष योगदान
प्रतिनिधी
रायगड (कोलाड -तिसे ) :- २६ जानेवारी रोजी तिसे ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ यांच्या सहभागाने प्रजासत्ताक दिनाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला तिसे ग्रामपंचायतचे सरपंच राकेश कांबळे, उपसरपंच जयेश घावटे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण बिरगावले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, ज्यासाठी ग्रामपंचायत आणि शाळा परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष आभार:श्री. गजानन गोरीवले: त्यांनी विनामूल्य स्पीकर व्यवस्था उपलब्ध करून दिली.सौ. गीता गणेश गोरीवले: शाळा, ग्रामपंचायत व अंगणवाडी परिसराची स्वच्छता करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.श्री. संदीप शिगवण: ध्वजस्तंभाची रंगरंगोटी उत्तमरीत्या पूर्ण केली.विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छ ठेवत उत्सवाची शान वाढवली. ग. भा. मालती मारुती मुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्केचपेन गिफ्ट देण्यात आले, त्यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमात वीर हनुमान युवक मंडळ, महिला मंडळ बचत गट, तसेच अष्टविनायक ग्रूप यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. यासोबतच श्री दगडूशेठ शिगवण, श्री नारायण गोरीवले, श्री तानाजी गोरीवले आणि इतर ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवक पवार मॅडम, अंगणवाडी सेविका वंदना शिगवण व प्रमिला बिरगावले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.ग्रामस्थांचा सहभाग:रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा व तिसे हायस्कूलच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.संपूर्ण तिसे गावातील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सामूहिक सहभाग घेतला. या कार्यक्रमाने गावातील एकता आणि सहकार्याचे प्रतिक उभे केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













