नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रा.प.का. पनवेलतर्फे जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रा.प.का. पनवेलतर्फे जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी

रायगड (पनवेल) ता. २७ जानेवारी :- वाढत्या रस्ते अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून तळोजा येथे रस्ता सुरक्षा विषयक चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात

आले.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रस्ता सुरक्षेबाबत त्यांची सर्जनशीलता आणि जाणीव जागरूकतेतून उमटलेली चित्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे श्री. स्वप्निल नेवसे, श्री. आशिष जयसिंगपूरे, श्री. रोहित कोळप (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक), आणि श्री. आरिफ शेख (वरिष्ठ लिपिक) यांनी हजेरी लावली. त्यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा नियम, वाहतुकीचे शिस्तपालन, आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.रस्ता सुरक्षा अभियान हे जनचळवळीचे रूप घेण्यासाठी सुरू करण्यात आले असून, या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षेचे महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न परिवहन विभाग करत आहे. रस्ता अपघात कमी करून सुरक्षित भारत घडवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]