खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने स्नेहगंध २०२५ – स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवाचे आयोजन
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पी.के. दरेकर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स खवटी यांच्या वतीने “स्नेहगंध २०२५” स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव दि. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विजय खोतू दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहुणे मा. श्री. बापूराव पवार (मॅनेजर, घरडा कंपनी लि.) व मा. श्री. अमोल अकुलकर (मॅनेजर, दीपक नोहाकेम कंपनी लि.) असणार आहेत.कार्यक्रमाची रूपरेषा:२३ जानेवारी २०२५:सकाळी ९:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद.सकाळी ९:०० वाजता रांगोळी स्पर्धा उद्घाटन.सकाळी १०:०० ते ११:०० – फनी गेम्स.सकाळी ११:०० ते १२:३० – महिलांसाठी हळदी कुंकू व आरोग्य विषयक व्याख्यान.२४ जानेवारी २०२५:सकाळी ९:०० – कबड्डी स्पर्धा उद्घाटन.सकाळी १०:०० – कॅरम स्पर्धा उद्घाटन.सकाळी ११:३० – फूड फेस्टिवल उद्घाटन.२५ जानेवारी २०२५:सकाळी ९:०० – क्रिकेट स्पर्धा उद्घाटन.सकाळी ९:३० – बुद्धिबळ स्पर्धा उद्घाटन.२६ जानेवारी २०२५:सकाळी ८:२० – ध्वजारोहण.सकाळी ८:४५ – कला व क्रीडा महोत्सव बक्षीस समारंभ.सायंकाळी ७:०० – विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम.स्थळ:न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पी.के. दरेकर ज्युनियर कॉलेज, खवटी मैदान.संस्थेच्या सर्व सदस्यांनी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













