६८ वा होमगार्ड वर्धापनदिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी :- दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी होमगार्ड उपपथक खवटी येथे ६८ व्या होमगार्ड वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात होमगार्ड जवानांचा उत्साह आणि सेवाभाव दिसून आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खवटी 
पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. प्रमोद दळवी सर होते. यावेळी पलटण नायक लहू सुर्वे, सार्जंट अनंत सुतार, सेक्सन लीडर विश्वास देवळेकर, जनार्दन पवार आणि सचिन कासार यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून होमगार्ड जवानांना त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन करण्यात आले. 
यानंतर विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी अधिकारी श्री. प्रमोद दळवी यांनी उपस्थित जवानांचे कौतुक करून त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होमगार्ड सेवेच्या महत्त्वावर आणि देशसेवेसाठी त्यांच्या योगदानावरही भर देण्यात आला.कार्यक्रमास खवटी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













