नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पद्यभूषण चरित्रकार डॉ. धनंजय कीर खुली लेख स्पर्धा: रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

पद्यभूषण चरित्रकार डॉ. धनंजय कीर खुली लेख स्पर्धा: रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे आयोजन

प्रतिनिधी राजेंद्र दळवी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने थोर चरित्रकार पद्यभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या स्मृतीपित्यर्थ जिल्हास्तरीय खुल्या लेखस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्देश ग्रंथप्रेमींसाठी लेखन कौशल्याला वाव देणे व डॉ. कीर यांच्या कार्याचा गौरव करणे आहे.स्पर्धेचे विषय:1. पद्यभूषण चरित्रकार डॉ. धनंजय कीर 2. व्यक्तिमत्व विकासात ग्रंथालयाचे महत्त्व 3. राष्ट्राच्या विकासात महाराष्ट्राचे स्थान स्पर्धेचे नियम व अटी:1. लेख स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टंकलिखित असावा.2. शब्दमर्यादा 1000 ते 1200 शब्द.3. कागदाच्या एका बाजूवरच लेख लिहावा.4. लेखावर स्वतःची ओळख (नाव, पत्ता, इत्यादी) नमूद करू नये.5. नाव, पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र कागदावर जोडून लेखासोबत पाठवावा.6. लेख 25 डिसेंबर 2024 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक:श्री महेंद्र रामचंद्र दळवी, “पुण्याई”, 674 ब, श्रीरामनगर, मु.पो. नाचणे, ता. जि. रत्नागिरी.पारितोषिके:1. प्रथम पारितोषिक: रु. 2000/-2. द्वितीय पारितोषिक: रु. 1500/-3. तृतीय पारितोषिक: रु. 1000/-4. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके.5. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र.यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या 2024-25 वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात येतील. अधिवेशनाचा दिनांक व स्थळ स्पर्धकांना भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात येईल.अधिक माहितीसाठी:संपर्क: 7972212944 (मंगळवार ते रविवार, सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:00).- रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]