कष्टांच्या अपार प्रवासाचा सुंदर शेवट श्री. दिपक दाजी चिपळूणकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ
प्रतिनिधी :समीर बामुगडे
रायगड ( रोहा ) :- रोहा तालुक्यातील निवी गावाचा सुपूत्र दिपक चिपळूणकर ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या शासकीय सेवेला १९९० ला प्रारंभ केल्या पासून निवी गावातील तरुणाना चागल्या प्रकारे मार्गदर्शन करुन तसेच गावचा विकास रोजगाराचा पाया काय असतो त्या बद्दल प्रोत्साहन केले व गावच्या मदतीसाठी त्यानी योगदान दिले आहे,कष्ट, प्रामाणिकता आणि उत्कृष्ठ कार्यपद्धती यांच्या माध्यमातून आपल्या गावाच्या विकासात योगदान देणारे श्री. दिपक दाजी चिपळूणकर यांची कारकीर्द सेवानिवृत्तीने एका यशस्वी टप्प्यावर पोहोचली आहे. त्यांच्या शासकीय सेवेला आणि ग्रामविकासातील योगदानाला गौरविण्यासाठी निवी गावातील 
नागरिकांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.*ग्रामविकासाचा दीपस्तंभ: श्री. दिपक चिपळूणकर यांची प्रेरणादायी वाटचाल* श्री. दिपक दाजी चिपळूणकर यांनी १७ मार्च १९९० रोजी शासकीय सेवेत पदार्पण केले आणि २६ मार्च १९९० रोजी रोहा पंचायत समितीत रुजू झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी घोसाळे ग्रामपंचायत अंतर्गत तांबडी आणि वाली ग्रामपंचायतींमध्ये काम केले. त्यांच्या निःस्वार्थ कार्याने ग्रामपंचायत क्षेत्राला दिशा दिली.१९९३ ते १९९४ पर्यंत येरळ, तिसा, चिचवली या ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. १९९६ साली धाटाव येथे कार्यरत राहून, वाशी, रोठ बुद्रुक, आणि चणेर या ग्रामपंचायतींचा अतिरिक्त चार्ज त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला. त्यांच्या कार्यकाळातील अचूक नियोजन आणि प्रामाणिकपणा यामुळे ग्रामपंचायतींना भरभराट मिळाली. गौरवशाली कारकीर्द: धाटाव ग्रामपंचायतीचे सुवर्णपान२००६ ते २०२४ दरम्यान, धाटाव ग्रामपंचायतीने अनेक पारितोषिके मिळवली. यामध्ये माजी सभापती भाईसाहेब पाशिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणकर यांनी प्रशासन आणि विकास यांचा सुरेख मिलाफ साधला. त्यांनी जलसंधारण, रस्ते बांधणी, पाणीपुरवठा योजना, आणि सामाजिक उपक्रमांद्वारे गावाच्या प्रगतीचा पाया घातला. थोडा आराम, खूप सारे आशीर्वाद”श्री. दिपक चिपळूणकर यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांचा विश्वास आहे की, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा प्रवास आनंदाचा आणि समाधानाचा असेल. त्यांचे अनुभव आणि कार्यतत्परता यांची आजही प्रेरणा राहील. सेवानिवृत्ती समारंभाचे तपशील दिनांक:शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०२४वेळ:सायं ५:०० वा.स्थळ: अक्षय लॉन्स, निवी-रोहा, ता. रोहा, जि. रायगड आपले आयोजक: सौ. दिपीका दिपक चिपळूणकर कु. रिद्धी दिपक चिपळूणकर कु. प्रेम दिपक चिपळूणकर तुमचं कार्य आमचं प्रेरणास्थान”तुमच्या सेवानिवृत्तीला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील प्रवास सुख-समृद्धीने भरलेला जावो, हीच आमची मनःपूर्वक अपेक्षा!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













