नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मा. श्री. सत्यजित देशमुख (भाऊ) शिराळा विधानसभा निवडणूकीत आमदारपदी विजय – आजचा महाराष्ट्र

मा. श्री. सत्यजित देशमुख (भाऊ) शिराळा विधानसभा निवडणूकीत आमदारपदी विजय

प्रतिनिधी सांगली 

सांगली (शिराळा) :- शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत माननीय श्री .सत्यजित देशमुख भाऊ यांची आमदार म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सत्यजित देशमुख यांनी प्रभावी प्रचार व मतदारांशी केलेल्या निकट संपर्काच्या जोरावर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली शिराळा मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.”मी या विजयाचे श्रेय मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि माझ्या टीमला देतो. शिराळ्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणार आहे,” अशी प्रतिक्रिया श्री सत्यजित देशमुख यांनी

दिली.नवीन आमदार म्हणून त्यांचे कार्यक्षेत्रातील समस्यांवर तातडीने लक्ष केंद्रित करून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.सत्यजित देशमुख भाऊ यांना आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल जनतेत आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्यकाळात शिराळ्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]