मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जारी
प्रतिनिधी
रायगड :- भारत निवडणूक आयोगाने दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार दि.२० नोव्हेंबर २०१४ रोजी मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, 
अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड किशन जावळे जारी केला आहे.अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार या विधानसभा मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडणे याकरिता बुधवार दि.२० नोव्हेंबर २०१४ रोजी मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद राहणार आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













