नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रावे खाडीत सापडला जिते येथील बेपत्ता सूरज ठाकूरचा मृतदेह – आजचा महाराष्ट्र

रावे खाडीत सापडला जिते येथील बेपत्ता सूरज ठाकूरचा मृतदेह

प्रतिनिधी/समीर बामुगडे 

पोलीस ठाण्यात खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद 

रायगड (रोहा) :- दादर पोलीस ठाणे हद्दीतील जिते येथे राहणाऱ्या २७ वर्ष युवकाचा मृतदेह रावे खाडीत सापडल्याने पेण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज मधुकर ठाकूर असे मृत युवकाचे नाव असून तो जिते येथील ठाकूर आळीत राहत असल्याचे समजून येत आहे.सूरज ठाकूर हा १५ ऑक्टोंबर रोजी घरातून बेपत्ता झाला

होता.या बाबत दादर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असताना चौथ्या दिवशी ता.१८ ऑक्टोंबर रोजी सूरजचा मृतदेह रावे खाडीच्या पाण्यात मिळून आला आहे.पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याने दादर सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश कदम हे करत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]