नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पनवेल आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर, प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणीची मागणी – आजचा महाराष्ट्र

पनवेल आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर, प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणीची मागणी

प्रतिनिधी पनवेल

रायगड (पनवेल) :- २५ सप्टेंबर २०२४ – प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचे प्रमुख कारण म्हणजे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्वपूर्ण मागण्यांची अंमलबजावणी न होणे.आरटीओ पनवेल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, २०२२ मध्ये मंजूर झालेल्या प्रादेशिक

परिवहन विभागांच्या नवीन आकृतीबंधाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांच्या तात्काळ पदोन्नत्या दिल्या जाण्याची मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, सेवा प्रवेशाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी देखील आहे.कर्मचाऱ्यांच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये पनवेल आणि ठाणे विभाग महसूल क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचे सुचवण्यात आले आहे, तसेच कनिष्ठ लेखापरीक्षक पदाच्या निरस्तीकरणानंतर त्यांना कार्यालय अधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी आहे.रत्नागिरी, पेण आणि सिंधुदुर्ग कार्यालयांतील निलंबन मागे घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना वाहन 4.0 आणि सारथी 4.0 प्रणालीचे लॉगिन तात्काळ देण्यात यावे, तसेच वेतन निश्चितीतील त्रुटी दूर कराव्यात, अशा मागण्याही समोर आल्या आहेत.आज पनवेल आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ. का.) श्री. सचिन विधाते यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. या बेमुदत संपामुळे पनवेलसह राज्यभरातील परिवहन सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]