नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गणेशोत्सवाची धामधूम: कुंभारवाड्यात उत्साहात गणेशमूर्तींचे आगमन – आजचा महाराष्ट्र

गणेशोत्सवाची धामधूम: कुंभारवाड्यात उत्साहात गणेशमूर्तींचे आगमन

प्रतिनिधी शशिकांत मटाने 

पाटण :- गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात शनिवारी पाटणसह तालुक्यात गणेश चतुर्थीचा उत्साह मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी आनंद आणि उत्साहाने गणेश मूर्तींचे स्वागत केले. सार्वजनिक गणेश मंडळांपासून घराघरांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.कुंभारवाड्यात गर्दीचा महापूर पाटणच्या कुंभारवाड्यात शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून गणेश भक्तांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आपल्या मंडळांमध्ये मूर्ती घेऊन जाण्यासाठी ढोल-ताशांच्या तालावर नाचत होते.पाटणमधील मानाच्या गणेश मंडळांसह प्रत्येक घराघरात आनंदोत्सवाचे वातावरण होते. विविध गणेश मंडळांचा सहभाग पाटण तालुक्यातील सुमारे दोन हजार गणेश उत्सव मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. हनुमान सेवा मंडळ, समाज सेवा संघ, प्रताप सेवा मंडळ, नूतन तरुण मंडळ यांसारख्या मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तहसीलदार कार्यालय, एसटी महामंडळ, नगरपंचायत पाटण

यांसह शासकीय कार्यालयांमध्येही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.गणेशमूर्तींच्या उंचीचा ट्रेंड यावर्षी पाटण तालुक्यात पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमधील उंच गणेशमूर्तींचा ट्रेंड पाहायला मिळाला. कुंभारवाड्यात १४ ते १५ फुट उंच गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. बाहेरून आलेल्या गणेश भक्तांनी या मूर्तींच्या आकर्षणामुळे दोन दिवसांपासून कुंभारवाड्यात मोठी गर्दी केली होती.सुरक्षा आणि व्यवस्था उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंभारवाड्यात आणि पाटण शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]