गोरी गणपती सण गोड झाल्याने महाराष्ट्र राज्य गावं कामगार संघटनेने केला खेड प्रशासनाचा जाहीर सत्कार
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य गावं कामगार संघटनेकडून खेड चे पोलिस निरीक्षक नितीन भोयर व खेड चे तहसीलदार सुधीर सोनावणे यांचा पोलिस पाटलांचे वाढीव १५०००/- नुसार चार महिन्यांचे मानधन जमा झाल्याने धन्यवाद म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या खेड प्रशासनाचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र गावं कामगार पोलीस संघटनेकडून जाहीर झालेले वाढीव मानधन व इतर मागण्या मान्य व्हाव्या म्हणून नागपूरला राज्य मेळावा घेण्यात आला होता.या मेळाव्यात महाराष्ट्र 
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मानधन जमा होईल असा GR काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार खेड तालुक्यातील पोलिस पाटलांचे एकूण ४ महिन्यांचे ६००००/- मानधन गणपती सणा अगोदर जमा झाल्याने खऱ्या अर्थाने पोलिस पाटलांचा गणपती सण गोड झाला आहे. या मानधन वाढीसाठी महाराष्ट्र गावं कामगार संघटनेचा सिंहाचा वाटा आहे.पोलिस पाटलाना खऱ्या अर्थाने मान व धन म्हणजे समाधान कारक मानधन* देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही संघटनेकडून खेड तालुका अध्यक्ष नितीन बेलोसे यांनी आभार मानले.या मानधन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या खेड महसूल विभाग व गुह खाते प्रशासनाचे गणपतीसणा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत संघटने कडून जाहीर सत्कार करण्यात आला .या वेळी तालुक्यातील सर्व पोलिस पाटील बंधू भगिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













