नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आलिबाग तालुक्यात मोदक स्पर्धाचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

आलिबाग तालुक्यात मोदक स्पर्धाचे आयोजन

प्रतिनिधी समीर बामुगडे 

रायगड (आलीबाग) :- गेल्या पंधरा वर्षांची परंपरा पाळत मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ,अलिबाग येथे मोदक स्पर्धा आयोजित केली होती. ह्या सोहळ्याला प्रमुख परीक्षक म्हणून सौ. नलिनी काकू मुंबईकर ,यू ट्यूब सेलिब्रिटी, Radisson ब्लू चे बेकरी विभागातले शेफ श्री. सुरेश म्हात्रे, आणि Radisson blu चे HR मॅनेजर श्री . ज्ञानेश्वर राऊत लाभले होते. परीक्षकांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ह्या स्पर्धेत दोन गटांमध्ये स्पर्धा घेतली गेली. एक विद्यार्थी गट आणि दुसरा खुला गट. खुल्या गटात अनेक सुगरणींनी भाग घेतला…आणि विद्यार्थी तर अत्यंत उत्साहात सहभागी झाले.

सगळे स्पर्धक अतिशय उत्तम शेफ आहेत हे आज जाणवलं. उत्तमोत्तम सादरीकरण, नवनवीन संकल्पना आणि भन्नाट चवीचे हे मोदक डोळ्यांचे तसेच चवीचे पारणे फेडणारे होते . सगळ्या स्पर्धकांना एक उत्तम अनुभव भेटला हे नक्की. सगळ्या परीक्षकांनी स्पर्धकांना भेटून, चव घेऊन आणि त्या मागची संकल्पना समजून घेऊन आपला निकाल दिला. दोन्ही गटात प्रत्येकी तीन विजेता जाहीर करण्यात आले. खुल्या गटात प्रथम क्रमांक – सौ.सरला नाईक, द्वितीय क्रमांक – सौ.मीरा घरत व तृतीय क्रमांक – सौ. प्रिती म्हात्रे आणि विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक – कु.सलोनी मयेकर द्वितीय क्रमांक – कु.मानस म्हात्रे , तृतीय क्रमांक – कु.अक्षय महाडिक हे विजेता ठरले. विजेत्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कु. रिया पडवळ , कु. वृषभ भोईर व कु. ऋतिक गायकवाड यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . तसेच सगळ्या स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. परीक्षकांना सन्मानचिन्ह आणि एक फुलझाड (रोपटे) देण्यात आले. एकंदरीत संपूर्ण सोहळा अत्यंत यशस्वी झाला. सौ. नलिनी काकू , शेफ सुरेश म्हात्रे यांनी छान मार्गदर्शन केले आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवला. ह्या सोहळ्याची संकल्पना , त्याचे सादरीकरण आणि ते पूर्ण

करण्याचे महत्त्वाचे काम प्रा. सौ. रश्मी वाघे ह्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम प्रा. श्री. श्रेयस म्हात्रे, आणि प्रा. गंधर्व पाटील यांनी केले. प्रा. आशुतोष गुरव , प्रा. स्वरांगी कवळे, आश्लेषा लोहार, महेश वेळे आणि निलदीप पाडावे यांनीही आयोजन यशस्वी करण्यात अथक प्रयत्न केले. प्रा. सौ. अनुराधा तेरेदेसाई यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगितली. सगळ्या स्पर्धकांना हॉटेल व्यवसायात असलेल्या अनेक संधींची ओळख करून दिली . स्पर्धकांनी पण त्यांचा आनंद व्यक्त केला आणि ही स्पर्धा आवडल्याचे सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]