नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दोन पुरस्काराने पंचायत समिती रामटेक सन्मानित – आजचा महाराष्ट्र

दोन पुरस्काराने पंचायत समिती रामटेक सन्मानित

प्रतिनिधी सचिन चौरसिया

घरकुल योजनेत ठरला रामटेक तृतीय पुरस्कारांचा मानकरी

नागपुर (रामटेक) :- ग्राम विकास व पंचायत राज विभागीय आयुक्त कार्यालय विभाग नागपूर तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महा आवास अभियानाअंतर्गत राज्यपुरस्कृत ग्रामीण आवास योजना विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पंचायत समिती रामटेकला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.पंचायत समिती रामटेक येथील गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांचा विकास करण्याच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले.त्यांच्याच या कार्याला अखेर यश आले आहे.पंचायत समिती रामटेक अंतर्गत घरकुल योजना उत्तमरित्या पार पाडल्याने जास्त

घरकुल कामे पूर्ण केल्याबद्दल तृतीय क्रमांक प्राप्त केला.त्याबद्दल विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी,जिल्हा प्रकल्प संचालक वर्षा गौरकर,विभागीय आयुक्त बिदरी यांच्याहस्ते गटविकास अधिकारी जयसिंग जाधव,सभापती चंद्रकांत कोडवते,पंचायत विस्तार अधिकारी सुभाष सानप यांनी तृतीय बक्षीस स्वीकारले.तर पंचायत समिती रामटेक कार्यालयात ग्रामसेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी व सभापती यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष लीलाधर सोनवाणे,चिंतामण बेलेकर,पंडित देवकर,धनराज पाटील,प्रवीण लव्हाळे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]