रोहा अष्टमी नगर परिषदेचा ऐतिहासिक सोहळा: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आता आपल्या नगरीत
प्रतिनिधी
रायगड (रोहा) :- २६ ऑगस्ट २०२४ रोहा अष्टमी नगर परिषद आयोजित करत असलेल्या एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सोहळ्यात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन व स्वागत समारंभ मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गुलामगिरी नाकारून स्वराज्याची स्थापना केली, त्यांचे हे पुतळ्याचे आगमन आपल्या नगरात एक 
विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. या सोहळ्यात सहभागी होणे हे प्रत्येक नागरिकासाठी एक कर्तव्य आहे. शिवभक्तांसाठी हा एक अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण असणार आहे.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत मा.खा. श्री. सुनिलजी तटकरे, खासदार रायगड लोकसभा सदस्य, आणि मा. ना.कु. आदिती वरदा सुनिल तटकरे, मंत्री, महिला व बालविकास, महानाष्ट्र राज्य हे मान्यवर सहभागी होणार आहेत. तसेच मा. श्री. अनिकेतजी तटकरे, आमदार विधान परिषद सदस्य, आणि समस्त शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.मिरवणूक सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता दमखाडी साई मंदिर येथून सुरु होऊन पोलिस चौकी येथे समारोप होणार आहे. श्री. पंकज अनिल मुझे, प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.शिवभक्तांसाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा असून, अवघ्या नगरातील नागरिकांनी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













