नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवी मुंबईमध्ये रिक्षा चालक-मालक एकता युनियन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी अविनाश भाऊ कदम यांची निवड – आजचा महाराष्ट्र

नवी मुंबईमध्ये रिक्षा चालक-मालक एकता युनियन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी अविनाश भाऊ कदम यांची निवड

अमोल चोपदार

नवी मुंबई :– दि.२१ ऑगस्ट गेली २९ वर्षांपासून नवी मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या रिक्षा चालक-मालक एकता युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. अविनाश भाऊ कदम यांची निवड करण्यात आली आहे. श्री. अविनाश कदम हे माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख आहेत. या संघटनेचे संस्थापक माननीय नवी मुंबई माजी पालकमंत्री आणि आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब आहेत, तर माजी अध्यक्ष श्री. सुनील बोर्डे यांनी वयोमर्यादेनुसार

आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत हा कार्यभार श्री. अविनाश कदम यांच्याकडे सोपवला. नव्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून दीपक भाऊ निगडे, कार्याध्यक्ष महेश निगडे, उपकार्याध्यक्ष विजय कडवेकर, सरचिटणीस शुभम चोरगे, उपसरचिटणीस राजू देवकर, खजिनदार अनिल चौधरी, उपखजिनदार अर्जुन बाबर (नाना), तसेच सदस्य म्हणून मारुती झाडे, अमोल चोपदार, दीपक सणस, आणि उमेश कोडक यांची निवड झाली आहे.या महत्त्वाच्या क्षणी माजी अध्यक्ष श्री. सुनील बोर्डे, टायगर ग्रुप नवी मुंबई अध्यक्ष श्री. रमेश भाऊ पाटील, बत्तीस शिराळा चालक-मालक युनियन अध्यक्ष श्री. श्रीरंग जाधव, शरद भाऊ मोहोळ युवा मंच नवी मुंबई अध्यक्ष अमोल निगडे, आणि माय बळीराजा संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री. संजय सपकाळ (बापू) यांची उपस्थिती होती. या सोहळ्यादरम्यान, संघटनेचे उपाध्यक्ष दीपक भाऊ निगडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या निवडीमुळे रिक्षा चालक-मालकांच्या हक्कांसाठी संघटना आणखी जोमाने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]