नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिबट्याच्या हल्ल्यात तीन महिन्याचा घोड्याच्या बछडा ठार – आजचा महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात तीन महिन्याचा घोड्याच्या बछडा ठार

प्रतिनिधी सचिन चौरसिया

नागपुर(रामटेक) :- रामटेक वन परिक्षेत्रातील श्री. मिताराम सव्वालाखे रा. रामटेक यांच्या शेतात नुकत्याच घडलेल्या घटनेत एक बिबट्याने त्यांच्या शेतातील घोड्याच्या तीन महिन्याच्या बछड्यावर हल्ला करून त्याला ठार केले आहे. ही घटना त्यांच्या घोड्याच्या थांबणी दरम्यान घडली.वनविभागाला माहिती मिळताच, श्री. ए. बी. भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बी. एन. गोमासे, क्षेत्र सहायक रामटेक, आणि श्री. दिलीप जाधव,

वनरक्षक रामटेक, यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मौका पंचनामा केला आहे आणि पुढील कार्यवाही सुरू केली आहे.श्री. ए. बी. भगत यांनी यावर विश्वास दिला आहे की, पशुमालक श्री. मिताराम सव्वालाखे यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. वनविभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून, अशा प्रकारच्या घटनांमध्ये तातडीने कारवाई करणे आणि आवश्यक ती मदत देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहेवन्यजीव हल्ले रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वनविभागाने आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या शेतात आणि आजूबाजूच्या क्षेत्रात विशेष लक्ष द्यावे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]