स्वातंत्र्य दिनी गट ग्रामपंचायत कोलीतमारा दिली रुग्णवाहिका भेट
प्रतिनिधी सचिन चौरसिया
नागपुर (रामटेक) :- पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम जंगल व्याप्त क्षेत्रातील गट ग्रामपंचायत कोलीतमारा व घाटपेंढरी परीसरातील रुग्ण सेवा सुकर व्हावी यासाठी कुशल समाज सेवक व माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रुग्णवाहिका सप्रेम भेट देऊन स्वातंत्र्य दिनाची आदिवासी समाज बांधवांना अनोखी भेट दिली आहे.नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र घाटपेंढंरी येथे सुरू झाले आहे. आदिवासी जंगल व्याप्त अती दुर्गम भागातील गावांमध्ये रात्री 
अपरात्री रुग्णालयात रुग्णांना तातडीने पोहचवण्यासाठी चौवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सामाजिक दायित्व म्हणुन रुग्णवाहिका भेट दिली आहे.माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर आदिवासी समाज बांधवांना रुग्णवाहिका भेट देऊन समाज बांधवांच्या चेहर्यावर आनंद प्रफुल्लित केला आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













