नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , म्हसळा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न – आजचा महाराष्ट्र

म्हसळा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी – जावेद धनसे 

रायगड (म्हसळा) :- म्हसळा तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला, ज्यामध्ये प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास श्री. माधव जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती म्हसळा, श्री. संतोष आवटी, सहायक पोलिस निरीक्षक म्हसळा, श्री. धर्मराज पाटील, निवासी नायब तहसिलदार म्हसळा, श्री. समीर बनकर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, श्री. संजय दिवेकर, उप नगराध्यक्ष, श्री. उदय

कळस, पत्रकार, श्री. सुरेश पाटील, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक, श्री. चंद्रकांत पवार, सरपंच, तसेच म्हसळा तालुक्यातील आपदा मित्र, नागरिक आणि वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात श्री. सुरेश पाटील, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक, रायगड जिल्हा यांनी उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी रायगड जिल्हयातील अतिवृष्टीच्या समस्या आणि नैसर्गिक तसेच मानव निर्मित आपत्तींचा

धोका यावर चर्चा केली. आपत्ती थांबवता येत नाही, पण त्यातून होणारी मनुष्य आणि वित्तहानी कमी करण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.मार्गदर्शन सत्रात श्री. पाटील यांनी आपत्तीपूर्वी, आपत्ती सुरु असताना, आणि आपत्तीनंतर काय करावे याबद्दल सखोल माहिती दिली. टाकाऊ वस्तूंपासून आपत्तीमध्ये उपयोगी साहित्य तयार करण्याच्या विविध पद्धती त्यांनी प्रात्यक्षिकांसह दाखविल्या. यामध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून बॉटल जॅकेट तयार करणे, कळशीला दोरी बांधून बचाव करणे, आणि लाईफ जॅकेटचा योग्य वापर कसा करावा हे समाविष्ट होते.या कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील आपदा मित्र श्री.

चंद्रकांत पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक आणि रुपये ५,००,०००/- ची विमा पॉलिसी प्रदान करण्यात आली. याचबरोबर, उप विभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांचे स्वाक्षरीचे ओळखपत्र सर्व आपदा मित्रांना वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपात श्री. सुरेश पाटील यांच्या योगदानाबद्दल त्यांना तहसिलदार यांच्या हस्ते आभारपत्र देण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]