रायगड मी मराठी प्रतिष्ठानची विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी साथ
प्रतिनिधि
रायगड(तळा) :- रविवार दि.१६/६/२०२४ रोजी रायगड मी मराठी प्रतिष्ठान(रजि.जी.बी.वी.एस.डी./१४२५/2029/एफ-७९४११) वसा संस्कृतीचा… ध्यास जनसेवेचा शिक्षणाचा प्रसार, भविष्य विद्यार्थ्यांचे, होणे आणि घडणे काळाची गरज. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी रायगड मी मराठी प्रतिष्ठानची साथ शैक्षणिक उपक्रम – 
२०२४ शैक्षणिक पर्व ५ वे (२०२४-२५)प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने सकाळी ठिक. १०.०० वाजता “शैक्षणिक उपक्रम ” आयोजित करण्यात आले संस्थेमार्फत कळसांबडे गावामध्ये शाळेतील मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.तरी या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक आदेश लाड व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते तसेच या उपक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कळसांबडे गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ, गावचे अध्यक्ष शरद भोसले,संतोष वाढवळ संदीप सुतार,सदा मोरे,अशोक वाढवळ, रमेश जाधव, चंद्रकांत मानकर, मनीष भोसले, केतन मानकर, राजेश मोरे, रा.जि.प कळसांबडे शाळेचे मुख्याध्यापक मनावर सर,शिक्षक व आडनाळे रा.जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर, व ग्रुप
ग्रामपंचायत काकडशेतचे माजी सरपंच शरद सारगे, कळसांबळे गावच्या मा.सदस्या वंदना केळकर, प्रणील अधिकारी या मान्यवरांनी उपस्थिती वाढवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमा दरम्यान रायगड मराठी प्रतिष्ठान या संस्थेने कळसांबडे गावचे श्री.तुषार नारायण मोरे यांची तळा तालुका संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.कळसांबडे गावातील शाळेच्या मुलांनी व ग्रामस्थांनी संस्थेचे मनापासून खूप खूप आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













