काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ . कल्याण काळे यांचा शुक्रवारी जालन्यात सत्कार
श्रीकृष्ण शेळके / जालना प्रतिनिधी
जालना :- जालना लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा उद्या दिनांक १४ जून रोजी शुक्रवार जालन्यात सत्कार आयोजित करण्यात आला आहे जुना जालना भागातील मुक्तेश्वर द्वार जवळ असलेल्या पाठक मंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी ९.३०.आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री आ. राजेश टोपे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा प्र

भारी तथा माजी आमदार नामदेव पवार , आ.कैलास गोरटीयाल, आ. राजेश राठोड माजी आ. चंद्रकांत दानवे, सुरेश कुमार जेथलिया, शिवाजीराव चौथे ,संतोष साबरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष. राजाभाऊ देशमुख, आर .आर .खडके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ,भास्करराव भास्कर आंबेकर. ये .जे.बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ.निसार देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, अनिरुद्ध खोतकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस .कल्याण दळे ,माजी ,नगराध्यक्ष. बबलू चौधरी. वसंत जाधव. गणेशराव राऊत. नंदकिशोर जागडे . याच्यासह महाविकास (इंडिया) आघाडीतील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे या सत्काराच्या कार्यक्रमास जालना शहर व लोकसभा मतदार संघातील महावीकास ( इंडिया) आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती रहावे असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख जालना शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राम सावंत यांनी केले आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













