एखाद्या जीवाची किंमत २५ लक्ष रुपये असू शकते का ?वाघाच्या बंदोबस्त करा अन्यथा तिव्र आंदोलन करु – सचिन किरपान
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
रामटेक तालुका व पारशिवनी तालुक्यातील देवलापार, करवाही, नवेगांव, पालोरा गावात वाघांच्या हल्ल्याचा घटना मागील काही महिन्यापासून सतत सुरु आहे. त्यात १० ते १२ शेतकऱ्यांचा व शेकडो जनावरांचे मृत्यू झाले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून वनविभागाने वाघांना जेरबंद करण्याची मोहीम सुरु केली आहे. पण वाघांना जेरबंद करणे हा खात्रीलायक उपाय आहे का ? असा प्रश्न नागरीक अधिकार मंचाचे मुख्य संयोजक सचिन किरपान यांनी केला आहे. पत्र परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले
नागपुर (रामटेक) :- देवलापार वनपरिक्षेत्रातंर्गतचा करवाही मधील छवारी शिवारात दि. (८) शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेताजवळील जंगलात पाळीव जनावर चराई साठी घेवून गेलेल्या गुराखी वर नाल्याच्या काठावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुण ठार केल्याची घटना घडल्याने गावातील नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे.
गावातीत शेतकऱ्यांचा व्यवसाय शेती व जंगलात तेंदुपत्ता जमा करने, जडी -बुटी, मोह फुल वेचने, दूध संकलन करने यावर यांचा परिवाराचा उदरनिर्वाह होत आहे. परंतु गेल्या काही महिन्या पासून रामटेक तालुका व पारशिवनी तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांचा वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा लागत आहे शेतात धान पिकांचा हंगाम सुरु होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन गायी-म्हशी आहेत त्यांचा चाऱ्यासाठी शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. जंगलालगतचा गावामध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ही दहशत एवढी आहे की जंगललगतचा गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही वाघाचा हल्ल्यात एखाद्याचा जीव गेला तर शासनाकडून त्याचा कुटुंबियांना २५ लक्ष रुपयाची मदत मिळते. एखाद्या जीवाची किंमत २५ लक्ष रुपये असू शकते का ? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का ? जर पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत वन अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा व जंगलात वाघाच्या हल्यात मृत्य झाल्यास आम्ही सर्व लोकवर्गणीतुन २५ नाही तर ५० लक्ष रुपये देऊ.वनविभाग पर्यटनाचा नावावर निधी जमा करतो. त्या निधीतून अनेक लोकहिताची कामे केली गेली पाहिजे. त्यांना जो नफा मिळत आहे त्यात सीएसआर फंडा अंतर्गत प्रत्येक जंगलालगतचा गावामध्ये ५० लक्ष रुपयाची विविध विकासकामे केली गेली पाहिजे. ज्यांचा जीव वाघाचा हल्ल्यात जात आहे त्या पीडिताचा परिवाराला १ कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे. शिवाय त्या कुटुंबातील एका व्यक्तीला पात्रतेनुसार स्थायी शासकीय नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे. वन विभागाने वाघाना जीपीएस टँकर लावले असुन ते फक्त वाघाची संख्या मोजण्या करीता आहे काय ? वाघ हा कोणत्या दिशेला आहे, हे कळल्यावर गावाजवळ असल्यास दवडी, कर्मचार्यांचा माध्यमातुन सुचना देण्यात यावी असा ही माध्यमाशी सचिनजी किरपान यांनी संवाद केला.लीकडे वाघाचे हल्ले वाढले आहे. गावातील शेतकरी भयभीत जीवन जगत आहे. शासनाने व प्रशासनाने आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नये. शासनाने यावर वनविभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा व उपाय योजना करावी अन्यता शासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल हा आंदोलन रुद्र स्वरूपाचा राहील असा ही इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन दिला. पत्रकार परिषदेत मुख्य संयोजक सचिन किरपान , निखील पाटील, मोहिम पठान, कीर्तीताई आहाडे, अरुणजी गदरे, चिंतामनजी वरखडे, यशवंतजी भलावी, पंचमजी कोवाचे, सेवकराम खंडाते मान्यवर उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













