नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी – आजचा महाराष्ट्र

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी

प्रतिनिधि

रायगड :- दि. ४.लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी ८ वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, २९ फेर्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण १० लाख १३ हजार २७२ मतांपैकी उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ४२५५६८ मते

2)श्री.सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – ५०८३५२ मते

3) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी) – १९६१८ मते

4) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष) – ९३९४ मते

5) श्री.अमित श्रीपाल कवाडे,(अपक्ष) – ५६३४ मते

6) श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष) – ३५१५ मते

7) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) – २५६० मते

8) श्री.पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष) – २४१७ मते

9) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष) – २०४० मते

10) श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी) – १९३९ मते

11) श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष) – १८२० मते

12) श्री.अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष) – १७९५ मते

13) श्रीमती अंजली अश्विन केळकर,(अपक्ष) – १३५० मते

14) नोटा – २७ हजार २७० मते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]