नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्यात उन्हाळी भात कापणी, बांधणी व झोडणीला सुरुवात,परंतु भात कापणीच्या कामात पावसाचे सावट, बळीराजाच्या चिंतेत वाढ . – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्यात उन्हाळी भात कापणी, बांधणी व झोडणीला सुरुवात,परंतु भात कापणीच्या कामात पावसाचे सावट, बळीराजाच्या चिंतेत वाढ .

प्रतिनिधि समीर बामुगडे 

रायगड(रोहा) :- रोहा तालुक्यातील बळीराजाचे रब्बी हंगामातील उन्हाळी भात पीक अंतिम टप्यात आले असून खांब पुगाव या विभागातील भातशेती कापण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरुवात झाली असुन याच दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी तुरलक प्रमाणात पाऊस पडल्याने भात शेती कापनी झोडणी मळणी कामात पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने तसेच ढगाळ वातवरणामुळे बळीराजाची चिंता वाढलेली दिसत आहे.रोहा तालुक्यातील उन्हाळी हंगातील भातशेती ही कोलाड पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत डोळवहाल धरणाच्या सिंचनातून कळव्या मार्फत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा आधारावर डिसेंबर ते मे महिन्या अखेर केली जात असुन या साठी शेतकरी वर्गाला अतिशय कठोर मेहनत घ्यावी लागते.या वर्षीही भात पीक अतिशय चांगले आणी समाधानकारक आले असले असुन भात कापणीला सुरवात करण्यात आली परंतु रायगड सह कोकणात वारा पावसाचे अंदाज दिला असुन पोलादपूर महाड परिसरात मागील दोन दिवस ११ व १२ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर त्या पाठोपाठ सोमवारी १३ में रोजी दुपारी दोन च्या सुमारास कोलाड खांब पुगाव परीसरात अचानक अवकाळी पाऊस बरसल्याने येथील शेतकरी आपल्या भात कापणीच्या कामात व्यस्त असतानाच अचानक पाउस पडल्याने बळीराजाची मोठी धावपळ करावी लागली तर बळीराजाची चिंता वाढल्याने असाच पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेल्या घास व पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मागील काही दिवांपासून उष्णतेचा पारा चढला आहे त्यात उष्म्याने नागरीक हैराण त्यात लोकसभेची निवडणुक अल्याने शेतकऱ्यांकडून शेतीची भात कापणीची कामे अधिक लांबली असल्याचे बोलले जात आहे अधिक प्रमाणावर वाढलेल्या उष्णतेमुळे मजूर ही मिळत नाहीत त्यामुळे शेतीचे काम अधिक लांबणीवर असतानाच अचानक पाउस आणि ढगाळ वातावरण त्यामुळे घटलेल्या पिकात अधिक पावसामुळे नुकसान होतो की काय ही देखिल चिंता बळीराजाला पडली असुन मध्येच पावसाचे सावट आणि ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढत असल्याचे दिसून येत आहे  गेल्या वर्षीही रोहा तालुक्यात भाताचे पीक उत्तम प्रकारे येऊन तुफान पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी ही भात पीक चांगले आले असुन ते कापणी,बांधणी, झोडणी साठी जोरदार सुरवात झाली आहे परंतु अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजून दहा ते पंधरा दिवस पाऊस लांबला तरच सर्व पीक कापून, बांधून, झोडून सुखरूप पुर्ण होईल व बळीराजा ही समाधानी होईल असे शेताकरी वर्गातून बोलले जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]