नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ  – आजचा महाराष्ट्र

नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ 

प्रतिनिधि

लातूर :- दि. २९.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (स्वीप) कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज लातूर शहरात पार पडलेल्या हाके व पांढरे परिवाराच्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी ७ मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.श्रीनिवास मंगल कार्यालय येथे उत्तम हाके यांचे चिरंजीव दिनेश व किसनराव पांढरे

यांची कन्या पूजा यांच्या शुभविवाहाचे औचित्य साधून लातूर जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी नवदाम्पत्यासह लग्न सोहळ्यास उपस्थित वऱ्हाडी मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याविषयी आवाहन केले.मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध समारंभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. याप्रसंगी शिक्षक सुनिल हाके यांच्या सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्वीप कक्षाचे सदस्य उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]