नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विहिर जवळील पाणी निकासी करण्यात ग्राम पंचायत अपयशी – आजचा महाराष्ट्र

विहिर जवळील पाणी निकासी करण्यात ग्राम पंचायत अपयशी

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागपुर (रामटेक) :रामटेक पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोहडोगरी येथील पिण्याचा पाण्याचा विहिरीचे पाणी नीकासी होत नसल्याने पाणी खूप दिवसापासून जमा झाले आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन पाण्यात जंतू निर्माण झाले. लोहडोगरी ग्राम पंचायत ला ग्राम स्वच्छ्ता अभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दुसरे पारितोषिक मिळालेली ग्राम पंचायत आहे. विहीर गावात असल्याकारणाने गावातील महिला पाणी पिण्यासाठी व दैनंदिन उपयोगात आणत असतात. विहीर चौकात असल्याने

नागरिक सुद्धा विहीर सभोवताल येऊन बसत असतात. पण मागील काही दिवसापासून विहिर जवळील पाणी बाहेर जात नसल्याने विहिरी सहभोवताल जमा झाले आहे. पाण्यामधे चील, जंतू सहित मच्छर ठळक पने दिसून येतात. ग्राम पंचायत कार्यालय लोहडोगरी येथे गावातील नागरिकांनी तक्रार केली असता ग्राम पंचायत ने मनुष्यबळ कामी लावले, पण ते पाणी नीकासी करण्यात अपयशी ठरले. विहिरी भोवताल नागरिकांचे वास्तव्य असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ग्राम पंचायत ने यावर तोडगा काढून उपाय योजना करून विहीर जवळील जमा झालेले पाण्याचा विसरा करण्यात यावा अशी मागणी युवराज कुथे, उमाकांत घरजाळे, सुनिल घरजाळे, माणिकराव भुसारी सह लोहडोंगरी गावातील नागरिकांनी केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]