गीते साहेब तुम्हाला मुस्लिम समाजाचा लळा व प्रेम निवडणुका आल्यावर कसा काय जाणू लागला..? इफ्तीकार अत्तार
प्रतिनिधि किरण बाथम
रायगड (पनवेल) :- दिल्लीत संसदेत एक प्रसंग पाहता अनंत गीते यांना मुस्लिम समाजाचा लळा व प्रेम निवडणुका आल्यावर कसा काय जाणू लागला..? असा सवाल भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे कोकण विभाग नेते इफ्तीकार अत्तार यांनी मांडला आहे.
सविस्तर मुद्दा मांडताना त्यांनी म्हटले,आठवते का १७ जुलाई २०१४ आपण दिल्लीमध्ये खासदार होता..उबाठा गटाचे शिल्लक राहिलेले खासदार राजन विचारे सहित ११ खासदार दिल्लीत होते.त्यावेळी दिल्लीच्या महाराष्ट्र सदन मधील कॅन्टीन मध्ये एक गरीब मुस्लिम कर्मचारी काम करत होता. रमजान महिना रोजाचे दिवस होते.त्या प्रामाणिक कर्मचाऱ्याचे नाव अर्शद जुबेर.

तुम्हाला जेवणाचा दर्जा आवडला नाही. तुमचा संताप गगनाला भिडला. चपाती चांगली नाही मिळण्याचे कारण धरून कॅन्टीनच्या किचनमध्ये जाऊन त्या मुस्लिम गरीब अर्शद जुबेर याच्या तोंडात जबरदस्तीने चपाती कोंबलीत.त्याचे पवित्र रमजानचे रोजे सुरू आहेत हे माहीत असून,त्या अर्शद जुबेर तरुणांचा उपास असून सुद्धा त्याला जबरदस्तीने त्याच्या तोंडात तीन वेळा रोटी ठोसून त्याचा उपवास तोडायला आपणच लावलात.
हेआपण केलेले पाप आहे तो मुलगा तीन-तीन वेळा तुम्हाला विनंती करून सांगत होता की, माझा उपवास आहे माझा रोजा तुटेल. तरीसुद्धा तुमच्या खासदार राजन विचारे सहित अकरा खासदारांनी त्या मुस्लिम समाजाच्या मुलाचे काही एक न ऐकता त्याला गुंडगिरी करून त्याचा उपास तोडायला लावलात. हे अपन केलेले एक पाप आहे.
कुठल्याही धर्माचे मन दुखावल्या जातील असा कृत्य करणे हा एक अपराध आहे. एवढे काही होऊन सुद्धा गीते साहेब आपण काय केले त्या उलट आपण त्या खासदारांची संसदेमध्ये बाजू घेऊन त्या मुस्लिम मुलाला खोटं ठरवण्याचं काम आपण केले. हे फार चुकीचे आहे मुस्लिम समाज हा सुशिक्षित आहे. तुमच्या या खोट्या प्रेमाला मुस्लिम समाज कधीही बळी पडणारा नाही. गीते साहेब त्या कृत्याचा ऑन रेकॉर्ड व तुमचा स्टेटमेंटची व्हिडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावर रेकॉर्ड आहे.तरी आपण कृपया करून मुस्लिम समाजाला खोटं प्रेम दाखवून त्यांची मत मिळवण्याचा प्रयत्न कदापि करू नये. असे मत इफ्तीकार अत्तार यांनी मांडले.
बेशरमो की बला दूर मारो जुता आयें नुर
मराठी मूस्लिम संघाचे कोण ते स्वयंघोषित अध्यक्ष. देशासाठी मुस्लिमांचे अगदी कोकणातील मुस्लिमांचे योगदान मोठे आहे.ते आहेच कोणी नाकारू शकत नाही. पण या अध्यक्षांचे समाजासाठीचे योगदान काय?
यांचा नक्की हेतू काय? खरं तर सगळ्याच समाजाने अश्या नकली नेत्यांपासूण सावध असणे आवश्यक आहे.असे म्हणून काहींनी समाजाच्या नावाने मांडलेल्या दुकानदारीवर त्यांनी कटाक्ष केला.मतदान हा आपला हक्क आहे आणि तो देशाच्या उन्नतीसाठी वापरणे हे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून सगळ्यांनी मतदान करावे अशा बागुलबुवांना किंमत देऊ नये असे आवाहन अत्तार यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













