रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ साठी २१ उमेदवारांचे अर्ज वैध ७ उमेदवारांचे अर्ज अवैध
प्रतिनिधि
रायगड :- दि.२०. ३२ – रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारांनी ४० नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत २१ उमेदवारांचे २७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून ७ उमेदवारांचे १३ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली.
७ उमेदवारांचे अर्ज अवैध
१)श्री.अनिकेत सुनील तटकरे, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,)
२)श्री.नरेश गजानन पाटील,(अपक्ष)
३) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी, (बहुजन समाज पार्टी)
४)श्री.उस्मान बापू कागदी,(अपक्ष)
५) श्री.अनिल बबन गायकवाड,(बहुजन समाज पार्टी)
६) श्री.भुपेंद्र नारायण गवते,(अपक्ष)
७) श्री.घाग संजय अर्जुन,(अपक्ष)
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













