स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप, स्वाभिमानासाठी संघर्षाचा शुभारंभ !
सचिन चौरसिया प्रतिनिधी
नागपूर :- लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात, युवाहृदयसम्राट श्री. आदित्य ठाकरे, आमदार श्री. रोहितदादा पवार, श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत नगर दक्षिण स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता सभा ऐतिहासिक गांधी मैदान येथे संपन्न झाली. आई मोहटादेवीच्या आशिर्वादासह सुरु झालेली नगर दक्षिण जनसंवाद यात्रा विशाल गणपतीच्या चरणी येऊन थांबली. यादरम्यान १९ दिवसात मतदारसंघातील सर्व गावं, वाड्या वस्त्यांवर जाऊन

नागरिकांसोबत संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे, संताप आहे. आमचा विकास का होत नाही? एकाच घरात आम्ही ५०-६० वर्षे सत्ता दिली ही आमची चूक झाली का? असा आर्त सवाल जनता विचारतेय. ज्यांना विश्वासाने निवडून दिलं होतं त्यांनी विश्वासघात केला याचं दुःख आहे. जनतेच्या भावना जाणून नगर दक्षिण मतदारसंघात परिवर्तनासाठी आपण निघालो असताना आपल्यावर टीका करण्यासारखं काही नाही, ५०-६० वर्षे सत्ता उपभोगुनही विकासाच्या नावाखाली दाखवण्यासारखं काहीही नाही म्हणून आता वैयक्तिक टीका केली जातेय. इंग्लिश येतं की नाही असं विचारलं जातंय. मला इंग्लिश येत नसली तरी माझ्या मायबाप जनतेच्या भावना मला नक्कीच समजतात. ५० वर्षांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. आता नगर दक्षिण मतदारसंघात इतिहास लिहिला जाईल, सामान्य जनतेने मिळून ५० वर्षांची सत्ता उलथवून लावली हा संदेश संपूर्ण देशात जाईल. ४ जून रोजी विजयाची तुतारी अशी दिमाखात वाजेल की तिचा आवाज दिल्लीपर्यंत ऐकू जाईल हा विश्वास आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













