नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आमदार जयस्वाल यांनी केले आपल्या गावात मतदान… – आजचा महाराष्ट्र

आमदार जयस्वाल यांनी केले आपल्या गावात मतदान…

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- रामटेक येथे सकाळी सहा वाजल्या पासूनच मतदानाला सुरुवात झाली. रामटेक विधानसभेत एकूण ३५७ मतदान केंद्रे होती. सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. मात्र, दुपारच्या सुमारास मतदानाची गती मंदावली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर सरासरी ६६ टक्के मतदान झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे.

रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथे प्रशांत हटवार नामक नवरदेवाने लग्नस्थळी जाण्यापूर्वी नवरदेव बाण्यात मतदानाचा हक्क बजावला. तर रामटेक विधानसभेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सुद्धा आपल्या गावी काचुरवाही येथे जाऊन मतदान केले. त्यांच्यासोबत काचुरवाही ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिकेत गोल्हर, सुभाष नागोसे, रोशन ढोबळे, विक्की बावनकुळे, दिनेश चरडे, प्रणित बावनकुळे, नाना चवडे, विनाश डोकरीमारे यांनी मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]