भक्ती स्वरभिषेक कार्यक्रम संपन्न
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- श्रीराम नवमीचा पावन पर्वावर सुपर मार्केट रामटेक येथे श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे आयोजित गायक निरंजन बोबडे प्रस्तुत भक्ती स्वराभिषेक कार्यक्रम रामधामचे संस्थापक श्री.चंद्रपाल चौकसे व सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका रामधाम तीर्थ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तिमय गाण्याने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. विविध सामाजिक संघटना, समिती, पत्रकार ह्या सर्वानी कार्यक्रम
सफलतेसाठी प्रयत्न केले. श्री. पी.टी. रघुवंशी, श्री. नितीनजी भैसारे (कार्याध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमिटी), बबलू दुधबर्वे, नासिर शेख, भाऊरावजी रहाटे सर, मोहन कोठेकर, अजय खेडगरकर, चंद्रकांतजी ठक्कर, सुभाषजी बघेले, नत्थूजी घरजाळे, अनिल वाघमारे, ऋषिकेश किंमतकर, कैलास चिंटोले, पिंटू भोयर, अमोल गाढवे, स्वप्नील रहाटे, दुष्यंत कारेमोरे, नाना उराडे, शोभाताई राऊत, शारदाताई बर्वे, विमलताई नागपुरे, रंजना मस्के, कांचनमाला माकडे, ह.भ.प. कलावती पडोळे, भागवतजी सहारे, शिवराम महाजन, रुपचंद नागपुरे, बाबुराव मोहारे व समस्त नगरवासी व समस्त रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













