नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अज्ञात वाहनचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु – आजचा महाराष्ट्र

अज्ञात वाहनचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

ईसमाचा जागेवरच मृत्यु तर वाहन चालक फरार

नागपुर (रामटेक) :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत भिल्लेवाडा येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार, मृतक जगदीश रामुजी निमरड वय ४४ वर्ष. रा.भिल्लेवाडा ता.रामटेक येथील रहिवासी मनसर येथे साक्षगंधाच्या कार्यक्रमाकरिता गेले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून ७ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३५ डब्लु ६२३६ नी घरी परत येत असताना मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील महामार्गावर एका भरदाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला

जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रामटेक पोलीस स्टेशन चे अधिकारी घटना स्थळी पोहचूण पंचनामा करण्यात आला. मृतकाला स्थानिक नागरिकांनी शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले असून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. अज्ञात वाहन चालकावर अप क्र. २७९/२४ कलम २७९,३०४ (अ) भादवी, सहकलम १३४ (अ) १३४ (ब) मोवाका गुन्हा दाखल करण्यात आला असुन मा. पोनी साहेबांचे आदेशाने स. पो. निरीक्षक खडसे पुढील तपास करीत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]