दिव्यांग मुलांचे शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- स्नेह सदन मतिमंद मुला मुलींची विशेष शाळा शितलवाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली मुख्याध्यापक पंकज पांडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांनी केलेल्या विविध कार्याची माहिती यावेळी उपस्थित शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांना दिल्ली यावेळी डॉ.बाबासाहेब व संविधानाने दिलेल्या आपल्या मूलभूत हक्क येणाऱ्या १९ एप्रिल निवडणुकीत आपण 
आपल्या तालुक्यातील शंभर टक्के १८ वय वर्ष वरील दिव्यांगांनी वयोवृद्धांनी मतदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व देशाप्रति आपले असलेले कर्तव्यध्यानात ठेवून सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी लोकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे अशी अपेक्षा व्यक्त केले यावेळी सचिन नाईक सहकुटुंब व शाळेतील शिक्षक प्रदीप बागडे प्रीतम मानकर प्रिया दुबे किश्वर शेख सविता आतकर कर्मचारी अशोक जी पातोडे सचिन झाडे सविता ढबाले अश्विनी वानखेडे सुनीता मसराम नितीन खेवले विशाल भाजीपाले अमन दीक्षित अतुल घोडाकाडे मोहन बागडे मीनाक्षी वाघधरे सह शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













