दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार देणारे माझे भीमराव- प्रा.किरण शेंद्रे
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ एप्रिल २०२४ रोज रविवारला बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी 
मार्गदर्शन करतांना प्राध्यापिका किरण शेंद्रे यांनी म्हटले की, दिनदुबळ्या, शोषित, पीडित, मागासलेल्या वर्गातील मानवांना जगण्याचा अधिकार मिळवून देणारे माझे डॉ.भीमराव आंबेडकर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नातून सम्पूर्ण भारतिय लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली नाहीतर आज देखील गरीब वर्गातील लोकांना शासकीय हुद्द्यापर्यंत पोहचता आले नसते. या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड.विभागप्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड.विभागप्रमुख प्रा.शालू वानखेडे, नॅक समनव्यक प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.किरण शेंद्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुळकर तसेच इतर प्रा.कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.मयुरी टेभूर्णे प्रा.आकाश मोहबिया, अतुल बुरडकर, राजेंद्र मोहनकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, निकिता अंबादे, निकिता फाये, सतीश कळंबे, संदीप ठाकरे इत्यादिसह विद्यार्थी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













