नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निवडणूक निरीक्षकांचा महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील नागरिकांसोबत संवाद – आजचा महाराष्ट्र

निवडणूक निरीक्षकांचा महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील नागरिकांसोबत संवाद

प्रतिनिधी चंदरपूर

चंद्रपूर :-  दि. १०.  १३– चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या तयारीची पाहणी करण्याकरीता सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जीवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या मतदान केंद्राला यांनी भेट दिली. तसेच येथे कार्यरत कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला.महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा, येसापूर, भेलापठार, लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा), शंकरलोधी, महाराजगुडा, कोठा (बु.), परमडोली, मुकदमगुडा आणि लेंडीजाळा या १४ गावांसाठी एकूण सहा मतदान केंद्र राहणार आहेत. यातील पुडीयालमोहदा आणि परमडोली या मतदान केंद्राला निवडणूक

निरीक्षक श्री. जाटव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पोलिस पाटील व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. निवडणूक संदर्भात काही अडचण आहे का, दोन्ही राज्यासाठी मतदान करता का, मतदार माहिती चिठ्ठी मिळाल्या का, याबाबत त्यांनी नागरिकांना विचारणा केली. यावेळी जीवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, नायब तहसीलदार श्री. वाहने, तलाठी मेटलवार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या : महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील १४ गावांसाठी असलेल्या सहा मतदान केंद्रातंर्गत २६९४ पुरुष मतदार तर २४२३ स्त्री मतदार असे एकूण ५११७मतदार आहेत. यात पुडीयालमोहदा मतदान केंद्रातंर्गत एकूण ७२२ मतदार (पुरुष – ३७४, स्त्री – ३४८), कुंभेझरी मतदान केंद्रातंर्गत एकूण १४३५ मतदार (पुरुष – ७५५, स्त्री – ६८०), भोलापठार मतदान केंद्रातंर्गत एकूण ८३१ मतदार (पुरुष – ४३६, स्त्री – ३९५), वणी (खु.) मतदान केंद्रातंर्गत एकूण ६१२ मतदार (पुरुष – ३२४, स्त्री – २८८), महाराजगुडा मतदान केंद्रातंर्गत एकूण ३०१ मतदार (पुरुष – १५२, स्त्री – १४९) आणि परमडोली मतदान केंद्रांतर्गत एकूण १२१६ मतदार (पुरुष – ७५३, स्त्री – 563) आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]